|
नियामक मंडळ समितीचे
|
|
|
कार्य
1. जिल्हा परिषद अध्यक्ष हे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या नियामक
मंडळाचे अध्यक्ष रहातील
व नियामक मंडळाच्या बैठका त्यांच्या
अध्यक्षतेखाली घेण्यात येतील.
|
|
|
2. प्रकल्प संचालक हे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या नियामक मंडळाचे
पदसिध्द सदस्य
सचिव असतील.
|
3. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद हे जिल्हा ग्रामीण विकास
यंत्रणेचे कार्यकारी समितीचे
अध्यक्ष रहातील.
|
4. सर्व प्रशासकिय व वित्तीय अधिकार अध्यक्ष, कार्यकारी समिती यांचेकडे
राहतील. कार्यकारी
समिती स्थापन करण्याबाबत वेगळयाने आदेश काढण्यात
येत आहेत.
|
5. राज्य व केंद्र शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनानूसार प्रत्येक तिमाहीस
नियामक मंडळाच्या
बैठका घेण्यात येतील.
|
6. ग्राम पंचायतीनी तयार केलेले प्रस्ताव पंचायत समितीने तपासावेत व
त्यांच्या शिफारशीसह
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेला सादर करावेत.
याबाबतच्या बैठका दर सहा महिन्यांनी किमान
एकदा घेण्यात याव्यात.
|
7. धोरणात्मक मार्गदर्शन व वार्षिक आराखडयाला मान्यता देणे, त्यांच्या
अंमलबजावणी बाबत
आढावा घेणे व संनियंत्रण करणे, इत्यादी बाबतची
कार्यवाही नियामक मंडळ करेल.
|
8. सर्व प्रकल्पांची प्राथमिक स्वरुपात आखणी करणे, त्यास मान्यता देणे व
त्यासाठी ढोबळ मानाने
निधीचे नियोजन करणे इ. क ार्यवाही नियामक
मंडळाकडून क रण्यात येईल.
|
9. कोणत्याही नविन प्रकल्पास किंवा योजनेस नियामक मंडळाची मान्यता
व मंजूरी घेण्यापूर्वी
देैनंदिन कमाची निकड लक्षात घेता, कार्योतर
मंजुरीच्या आधीन राहून अध्यक्ष, जिल्हा ग्रामीण
विकास यंत्रणांची मान्यता
घेऊन कार्यवाही करता येणे शक्य राहील.
|
10) ग्राम पंचायती, पंचायत समिती व पंचायत समितीचे सभापती हे त्याच्या
कार्यक्षेत्रात
अंमलबजावणी करण्यात येणा-या योजनांचे पर्यवेक्षण करतील.
|
11) नियामक मंडळाद्वारे मंजूर वार्षिक आराखडयाच्या आधीन राहून
दैनंदिन कामाना प्रशासकिय
व वित्तीय मंजुरीचे अधिकार कार्यकारी समितीचे
प्रमुख या नात्याने मुख्य कार्यकारी अधिकारी,
जिल्हा परिषद, यांना राहतील. या
सर्व प्रशासकिय, वित्तीय व तांत्रिक मंजुरीसाठी मुख्य कार्यकारी
अधिकारी व
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेची कार्यकारी समिती पूर्णपणे शासनाला जबाबदार
राहतील.
|